Jaimaharashtra news

‘तुमची तोंडी हागवण आता बास!’ संजय मांजरेकर यांना फटकारलं!

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा सध्या त्यांच्या ट्विटमुळे सध्या चर्चेत आला आहे. भारताचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी जडेजाच्या बाबतीत केलेल्या ट्विटरमुळे जडेजाने नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी व्यक्त करताना त्यांने ‘तुमची तोंडी हगवण फार ऐकली, आता बस!’अशा शब्दात मांजरेकरांना सुनावले आहे.

नेमकं काय घडलं?

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या World Cup मध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा अजून एकही सामना खेळू शकला नाही.

मात्र, त्याने बदली फिल्डर म्हणून वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली.

भारताचे माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी कंमेण्ट्री करताना मात्र जडेजाचा खेळ अतिसामान्य असल्याचं वक्तव्य केलं.

जडेजाची फलंदाजी आणि गोलंदाजीही सुमार दर्जाची आहे. त्यामुळे मी त्याचा फॅन नाही. असं विधान मांजरेकर यांनी केलं.

या वक्तव्याने संतापलेल्या जडेजाने  Twitter वरुन  संजय मांजरेकर यांना फटकारलं आहे.

‘तुम्ही खेळलेल्या सामन्यांपेक्षा मी दुप्पट सामने खेळलो आहे आणि अजूनही खेळतोय. ज्यांनी काही साध्य केलंय, त्यांचा आदर करायला शिका. मी तुमची तोंडी हगवण खूप ऐकली. आता बस!’, अशा शब्दात जडेजाने Tweet द्वारे मांजरेकरांना सुनावले आहे.

 

जडेजाने केलेल्या या ट्विटमुळे जडेजा सध्या चर्चेत आहे

 

Exit mobile version