Fri. Sep 30th, 2022

मराठा आरक्षणाबाबत समिती गठित

Committee formed regarding Maratha reservation

मराठा आरक्षणाबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय, नेमणुका विद्यमान राज्य सरकार बदलत आहे. त्यामुळे सहाजिकच विविध समित्या, महामंडळे यांच्या नेतृत्वातही बदल होताना दिसतो आहे. सध्याची बदललेली समिती हा सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार एक समिती गठित करण्यात आली आहे. याच अध्यक्ष पद चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं आहे. यापुढे मराठा आरक्षणबद्दल बैठका होतील किंवा शिष्टमंडळे येतील जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील ते ही समिती घेईल यावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन महाविकासआघाडी सरकारमध्येही अशा प्रकारची समिती नेमण्यात आली होती. ही समिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील हे मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री या समितीचे सदस्य होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.