Sun. Jul 12th, 2020

#CWG2018 कुस्तीपटू सुशील कुमारला सुवर्णपदक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीपटू सुशील कुमारनं अव्वल दर्जाची कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 74 किलो फ्रीस्टाईलमध्ये सुशील कुमारनं सुवर्णपदक जिंकलं आहे. सुशील कुमारनं अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्नेस बोथाचा 10-0 असा धुव्वा उडवला आहे.

सुशीलनं मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे भारताच्या खात्यातील सुवर्णपदकांची संख्या 14 वर पोहोचली आहे.  भारताला ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत दोन पदके जिंकवून देणारा एकमेव क्रीडापटू, अशी सुशील कुमारची ओळख होती. 2012 साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतातील बरीच मुलं कुस्तीकडे वळाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *