Thu. Sep 29th, 2022

राष्ट्रकुल विजेत्यांचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंशी संवाद साधला आहे. यावेळी जिंकलेल्या आणि सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी स्वागत केले आहे. भारतीय खेळाडू नव्या नव्या खेळात प्राविण्य मिळवत आहेत असं पंतप्रधान म्हणाले आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तब्बल ६१ पदकं मिळवली आहेत. त्यामध्ये भारताच्या मुलींनी आणि नव्या खेळाडूंनीही चांगले प्रदर्शन केलं आहे. हा तुमचा खेळ देशासाठी प्रेरणादायी आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये एकूण ६१ पदके जिंकली आहे. यानिमित्तानं खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकं जिंकली आहेत.

यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेण्याची भारताची १८ वेळ आहे. यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत भारतातील एकूण १०४ पुरुष आणि १०४ महिलांनी सहभाग घेतला होता. भारतासाठी पुरुषांनी ३५ तर महिलांनी २६ पदकं जिंकली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक पदकं जिंकली आहेत.

कुस्तीमध्ये भारताने एकूण १२ पदकं जिंकली आहेत. या खेळात भारतीय कुस्तीपटूंनी ६ सुवर्ण, एक रौप्य आणि ५ कांस्य पदकं जिंकली आहेत. तसेच वेटलिफ्टिंगमध्ये भारताने १० पदकं जिंकली आहेत. याशिवाय भारतीय बॉक्सर्सनेही सात पदकांवर नाव कोरलं आहे.

1 thought on “राष्ट्रकुल विजेत्यांचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

  1. Greetings! I’ve been readіng your blog for some time now
    and finally got the ƅravery to go ahead and ցive you
    a shout out from ᛕingwood Tⲭ! Just wanted t᧐ mention ҝeep up the good work!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.