Fri. Jul 30th, 2021

Virginity चाचणीवरून असंवेदनशील समाजाचं धक्कादायक दर्शन!

विवाहापूर्वी मुलगी Virgin आहे की नाही, यासाठी कंजारभाट समाजात आजही कौमार्य चाचणी घेतली जाते. याच virginity test वरून कंजारभाट समाजातील जातपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या चाचणीला एका तरुणाने विरोध केला म्हणून समाजाने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला. मात्र एवढ्यावरच न थांबता त्याच्या आजीच्या अंत्ययात्रेवरदेखील हा बहिष्कार कायम ठेवून समाजाच्या मेलेल्या संवेदनेचं दर्शन घडवलं.

माणूसकीची अंत्ययात्रा!

केवळ virginity test ला विरोध केला म्हणून समाजाने एका तरुणावर आणि त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला.

एवढंच नव्हे, तर त्याच्या आजीच्या अंत्ययात्रेतही हा बहिष्कार कायम ठेवला.

हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही, तर अंत्ययात्रा सुरू असतानाच एका हळदी कार्यक्रमानिमित्त मोठय़ांदा डीजे लावून नाचगाण्यात आनंदही साजरा केला गेला.

या गोष्टीची भलामण करणारे जातपंचायतीच्या एका नेत्याचे भाषण समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

काय घडलं होतं?

कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीचे प्रकार मधल्या काळात बाहेर आल्यानंतर या समाजातील जात पंचायत वादाच्या केंद्रस्थानी आली होती. जात पंचायतींच्या बहिष्काराची अशीच एक घटना अंबरनाथ शहरात समोर आली आहे. अंबरनाथमध्ये राहणारे विवेक तमायचीकर यांचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर समाजातील जात पंचायतीच्या मागणीनुसार होणाऱ्या कौमार्य चाचणीला विवेक यांनी विरोध केला. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून समाजाच्या जात पंचायतीने त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार घातला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *