Thu. Jun 20th, 2019

IRCTC वर नग्न जाहिराती, तक्रारदारच पडला ‘असा’ तोंडघशी!

0Shares

भारतीय रेल्वेच्या IRCTC च्या अॅपवर येणाऱ्या जाहिरातींमध्ये अर्धनग्न महिलांची उत्तान चित्रं दिसत असल्याची तक्रार एका जागरूक तक्रारदाराने केली. या तक्रारीची IRCTC ने दखलही घेतली. मात्र त्यावर जो रिप्लाय IRCTC ने दिलाय, त्य़ामुळे ही तक्रार तक्रार करणाऱ्याच्याच अंगाशी आली आहे.

 

काय तक्रार होती या व्यक्तीची?

IRCTC च्या तिकीट बुकिंग अ‍ॅपवर महिलांचे आंतरवस्त्रातील नग्न, अर्धनग्न फोटो असणाऱ्या जाहिराती दिसतात, असी तक्रार एका नेटिझनने Twitter वर केली.

या ट्विटमध्ये त्याने रेल्वेचं अधिकृत ट्विटर हँडल तसंच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनाही टॅग केलं.


मात्र त्यानंतर त्याला जे उत्तर मिळालं, त्यामुळे मात्र या नेटिझनवरच खजिल व्हायची वेळ आलीय.

 

IRCTC चं प्रत्युत्तर!

या नेटिझनच्या तक्रारीची IRCTC ने दखल घेतली.

त्याला Twitter वरच reply देखील देण्यात आलाय.

मात्र या रिप्लायमुळे या तक्रारदार नेटिझनचीच पोलखोल झाली आहे.


“ऑनलाईन जाहिरातींसाठी IRCTC Google चं ADX हे टूल वापरतं. इंटरनेट युजर गुगलवर ज्या गोष्टी सर्च करतात, त्याच्या कुकीजची हिस्ट्री ब्राऊजरमध्ये तयार होत असते. नंतर इंटरनेट युजर ज्या कोणत्या वेबसाईट्स किंवा अ‍ॅपवर जातो, तिथे त्याला त्याने आधी केलेल्या सर्चशी संबंधितच जाहिराती दाखवल्या जातात. त्यामुळे अशा जर जाहिराती तुम्हाला टाळायच्या असतील तर आधी ब्राऊजिंग हिस्ट्री क्लिअर करा”

IRCTC च्या या टेक्निकल भासणाऱ्या उत्तरातून असं सूचवलं गेलंय, की संबंधित नेटिझन हा IRCTC चं अ‍ॅप वापरण्यापूर्वी अश्लील गोष्टी सर्च करत होता. त्यामुळेच त्याच्याशी संबंधित जाहिराती त्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्याशी IRCTC चा काही संबंध नाही. उलट अश्लील गोष्टी सर्च केल्यावर त्याचा मागमूस न ठेवण्याची काळजी नेटिझनने घेतली नाही उलट ते त्याने जगजाहीर करून टाकल्याचंच सिद्ध झालंय.

या रिप्लायानंतर या तक्रारदार नेटिझनला लोकांनी Twitter वर चांगलंच ट्रोल केलं जातंय.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: