Jaimaharashtra news

कोर्टाच्या अवमान प्रकरणी नागपूर हायकोर्टाची फेसबुक, गुगल, ट्विटरसह केंद्र आणि राज्याला नोटीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सध्या सोशल साईट् सवर न्यायालयाविरोधात पोस्ट टाकून न्यायव्यवस्थेचा अवमान करण्याचं प्रमाण वाढले.

 

फेसबुकवर तर चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या नावानं एक पेज तयार करण्यात आलं असून यावर अश्लील पोस्ट टाकले जात आहेत.

 

यामुळं न्यायालय आणि न्यायव्यवस्थेचा अवमान होतोय. याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्वत:हुन जनहित याचिका दाखल करून घेतली.

 

अपप्रवृत्तींवर वचक बसावा यासाठी नागपूर खंडपीठानं केंद्र सरकार, गृह विभागाचे सचिव, सायबर क्राईम सेल, आकाश शाह, आय.के. चुगानी यांच्यासह गुगल, फेसबुक, ट्विटर, युट्यूब

यांना नोटीस बजावत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Exit mobile version