Wed. Oct 5th, 2022

द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात स्पर्धा

भारताच्या राष्ट्रपती पदासाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर गुरुवारी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अवघ्या देशाचं लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे.देशाला नवे राष्ट्रपती मिळणार असून बहुमताच्या जोरावर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांकडून उमेदवारी देण्यात आलेले यशवंत सिन्हा यांनी लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी मतदान करण्यासंदर्भात आवाहन देखील केले होते. त्यामुळे आता नेमकी मतमोजणी झाल्यानंतर निकाल काय लागणार? याकडे लक्ष लागले आहे.पहिल्या फेरीत द्रौपदी मुर्मू याना ५४० मते मिळाली होती तर यशवंत सिन्हा यांना २०८ तर पहिल्या फेरी नांतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची दुसरी फेरी हि पूर्ण झाली आहे. दुसऱ्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना १३४९ मते मिळाली आहे तर यशवंत सिंहा यांना ५३७ मते मिळाली आत्ताच आलेल्या माहिती नुसार मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे.आलेलय माहिती नुसार द्रौपदी मुर्मू यांना यशवंत सिंहा यांच्या पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.तर द्रौपदी मूर्मु या विजयाच्या उंबरठ्यावर आहेत असे चित्र दिसत आहेत.द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाच्या घोषणेआधीच सर्वत्र जल्लोष पहिला मिळत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निकाला कडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

सध्या देशाचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार असून नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेतील. सर्व राज्यांतील मतपत्रिका संसद भवनात आणण्यात आल्या आहेत. संसदेच्या ६३ क्रमांकाच्या खोलीत मतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी सज्ज झाले आहेत. या सभागृहात चोवीस तास मतपत्रिकांची सुरक्षा करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.