Thu. Sep 29th, 2022

मुश्ताक अहमद शेख वक्फ बोर्ड प्रकरणातील तक्रारदार

  पुण्यातील वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकल्याची बातमी समोर आली. मात्र वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी पडली नसल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली आहे. आता वक्फ बोर्डाच्या जमीन प्रकरणातील तक्रारदार पुढे आला आहे. मुश्ताक अहमद शेख हा वक्फ बोर्ड प्रकरणातील तक्रारदार आहे. ‘मीच ३ नोव्हेंबर रोजी या जमिनीच्या प्रकरणाची तक्रार ईडीकडे केली’ असे मुश्ताक अहमद शेख  यांनी सांगितले.

  ‘आज ईडीने वक्फ बोर्डच्या कार्यालयावर छाप टाकली. त्यामुळे ईडीने तत्परतेने केलेल्या कारवाईबाबत मी समाधानी असल्याचे’ वक्फ बोर्ड जमिन प्रकरणातील तक्रारदार मुश्ताक अहमद शेख यांनी सांगितले. मुश्ताक अहमद शेख यांनी सांगितले, वक्फ बोर्डाच्या मालकीची चार हेक्टर जागा एका ट्रस्टची असल्याचे दाखवण्यात आले. या ट्रस्टकडून जागा शासनाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिग्रहित केली. अधिग्रहित केल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची झाली, असे त्यांनी सांगितले.

  तसेच ते म्हणाले, शासनाने या जमिनीसाठी नऊ कोटी साठ लाख रुपये ट्रस्टला दिले. तसेच वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला एन.ओ.सी देण्यात आली. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग असू शकतो. मात्र मी यामध्ये नवाब मलिकांचे नाव घेत नाही. हिंजवडी आयटी पार्कजवळ असलेली ही जागा चार हेक्टर इतकी आहे. मात्र मी केलल्या तक्रारीची दखल घेत ईडीने तत्परतेने केलेल्या कारवाईबाबत मी समाधानी असल्याचे तक्रारदार मुश्ताक अहमद शेख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.