Wed. Jul 28th, 2021

…म्हणून पुण्यात नागरिकांनी केली मांजरींविरोधात तक्रार

रात्रीच्या वेळी मांजरांच ओरडणं आणि रडण्यामुळे झोपमोड होते म्हणून पुण्यात एका नागरीकाने तक्रार केली आहे. महानगरपालिकेच्या सारथी या वेबसाईटवर तक्रार करण्यात आली आहे. अशा दहा तक्रारी वेबसाईटवर दाखल झाल्या आहेत.

नागरीकांनी त्यांच्या समस्या, तक्रारी महानगरपालिकेपर्यंत पोहचवता येतील यासाठी ही वेबसाईट ओपन करण्यात आली आहे. या वेबसाईटवर या मांजरीण्यांसंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील शाहूनगर, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, अजमेरा कॉलनी, आकुर्डी – चिखली, साने चौक या सगळ्या भागातील या तक्रारी आहेत.

या वेबसाईटवर नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या, डुकरांच्या किंवा मोकाट जनावरांच्या अनेक तक्रारी दाखल येत असतात. परंतु मांजरीणीच्या तक्रारीमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ‘सारथी’ या वेबसाईटवर लोक बिनधास्तपणे तक्रारी नोंदवल्या आहेत.

रात्री या मांजरीणी ओरडत असतात त्यांच्या मोठमोठ्याने ओरडण्याने झोप होत नाही. अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावर आता कशी कारवाई करायची यावर महापालीका कर्मचारी चक्रावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *