Sat. Jul 31st, 2021

सचिन तेंडुलकरविरोधात तक्रार, ‘हे’ त्याचं स्पष्टीकरण!

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकरविरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी सचिन तेंडुलकर एकाच वेळी लाभाची दोन दोन पदं उपभोगत असल्याची तक्रार केली आहे. क्रिकेट सल्लागार समितीच्या पदाचा लाभ घेणारा तेंडुलकर IPL मधूनही लाभ मिळवत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

सचिन तेंडुलकरप्रमाणेच व्ही.व्ही.एस. लक्ष्मणविरोधातही अशा प्रकारची तक्रार करण्यात आली आहे. यावर उत्तर देण्यासाठी सचिन तेंडुलकरने लोकपाल डी.के. जैन यांच्याकडे आपली बाजू मांडली आहे.

मुंबई इंडियन्सकडून मला पैसे मिळत नाहीत!”

तक्रारीसंदर्भात सचिन तेंडुलकरकडून चौदा कलमी उत्तर पाठवण्यात आलंय.

लाभाची दोन पदं उपभोगत असल्याचा दावा सचिन तेंडुलकरने फेटाळून लावलाय.

‘मुंबई इंडियन्स’कडून आपल्याला कोणताही आर्थिक फायदा मिळाला नसल्याचा दावा त्याने केलाय.

निवृत्तीनंतर आपण मुंबईच्या संघाबरोबर खेळलोही नसल्याचंत्याने म्हटलंय.

मुंबई इंडियन्स संघासाठी मी कोणतंही पद भूषवत नाहीय.

या संघाचा ‘आयकॉन’ म्हणून मिळालेलं पद हे नाममात्र आहे. हे कोणतंही आर्थिक लाभाचं पद नाही.

‘Mumbai Indians’ शी संबधित कोणतेही निर्णय आपण घेत नाही. BCCI ला याची कल्पना आहे, असं सचिन तेंडुलकर याने आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *