Sun. Jun 20th, 2021

हनी सिंग, नेहा कक्करचं ‘मखणा’ अश्लील, कारवाईची मागणी!

आजकाल अनेक रॅपर, गायक त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि गाण्याच्या पद्धतीने पॉप्युलर होतात. तरुणाईत त्यांची गाणी लोकप्रिय होतात. मात्र त्याचवेळी तरुणांना आकर्षित करण्याच्या नादात अनेकदा वाह्यात शब्दप्रयोग, अश्लील गाणी यांमुळे गाणी वादग्रस्त ठरतात. यो यो हनी सिंग याच्या अनेक गाण्यांनी लोकप्रियता मिळवली. मात्र त्याच्या गाण्यात दारूला प्रोत्साहन तसंच महिलांसंदर्भात आक्षेपार्ह शब्द यांमुळे त्याच्यावर वारंवार टीका होतेय. सध्या त्याच्या ‘मखणा’ या गाण्यातील शब्दांवरून त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

‘मखणा’ गाण्यातील शब्द अश्लील!

यो यो हनी सिंगचा ‘मखणा’ हा नवीन म्युझिक व्हीडिओ नुकताच प्रदर्शित झालाय.

या म्युझिक व्हीडीओ मध्ये हनी सिंग सोबत गायिका नेहा कक्कर देखील आहे.

या गाण्यात महिलांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत.

‘मैं हूँ वूमनायझर’ (मी आहे स्त्रीलंपट) तसंच ‘सिलिकॉनवाली लडकीयों को मैं पकडता नही’

हनी सिंगच्या रॅपमध्ये महिलांबाबत अशोभनीय व आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप त्याच्यावर केला गेला आहे.

पंजाबच्या महिला आयोगाने या गाण्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली आहे.

पंजाबच्या महिला आयोगाच्या मनीषा गुलाटी यांनी ही मागणी केली आहे.

मनीषा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून 12 जुलैपर्यंत याबाबतचा अहवाल मागितला आहे.

हनी सिंगशी संबंधीत कंपनीवरही कारवाई

‘हनी सिंगच्या रॅपमध्ये महिलांविषयी अशोभनीय भाषा वापरली आहे.

त्यामुळे हनी सिंग व संबंधित कंपनी अर्थात टी-सीरिजचे भूषण कुमार यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी.

तसंच त्याच्या या गाण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मनीषा यांनी केली आहे.

हनी सिंग गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब झाला होता. तो अमली पदार्थांच्या आहारी गेल्याच्या अनेक चर्चा होत्या.  त्याचे दमदार आगमन पुन्हा होईल या आशेवर त्याचा चाहता वर्ग होता. त्याप्रमाणे त्याचं आगमन झालंही, मात्र हनी सिंग पूर्वीप्रमाणे वादग्रस्त ठरणार अशी चिन्हं दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *