Sun. May 16th, 2021

कनिका कपूरवर गुन्हा दाखल

सुप्रसिद्ध प्लेबॅक सिंगर कनिका कपूर हिने आपण कोरोनाग्रस्त असल्याचं उघड केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. लंडनवरून येताना टेस्ट चुकवून आल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर तिने चक्क पार्टीसुद्धा केली. त्यामुळे पार्टीमध्ये सहभागी झालेल्या अनेक लोकांची भीतीने गाळण उडाली आहे.

कनिकामुळे आणखी तीनजणांना कोरोनाची लागण झाल्याचं एका वृत्तसंस्थेने केलेल्या Tweet करून म्हटलं आहे. आता कनिका आणि तिच्या कुटुंबाला Quarantine केलं गेलं आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. कनिका कपूरने केलेल्या पार्टीतही शेकडो लोक उपस्थित होते. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि त्यांचे पुत्र दुष्यंत सिंह हेदेखील पार्टीत उपस्थित होते. कनिकाच्या कोरोनाबद्दल माहिती मिळताच या नेत्यांनी सेल्फ-आयसोलेशनमध्ये राहाणार असल्याचं ट्विट केलं आहे. तसंच काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद तसंच उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंगसुद्धा पार्टीत होते. दुष्यंत सिंग हे कनिका कपूरशी झालेल्या भेटीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही राष्ट्रपती भवनात भेटले होते. त्यामुळे कितीजणांना कोरोनाची लागण होऊ शकते, अशी भीती सर्वत्र आहे. कनिकाच्या संपर्कात आलेल्यांपैकी ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलंय. कनिकाचं हे वर्तन दुर्लक्ष करण्यासारखं नसून ते अत्यंत गैरजबाबदारीचं आहे. त्यामुळेच तिच्यावर लखनौमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *