Fri. Oct 18th, 2019

आश्वासन पूर्ण न केल्यास कसे करुन घ्यायचे ते आम्हाला महिती आहे – चंद्राबाबू नायडू

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास सुरुवात केली आहे.

केंद्र सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी चंद्राबाबू नायडू करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंध्र प्रदेशात रॅली झाल्यानंतर लगेचच चंद्राबाबू नायडू यांनी उपोषणास सुरुवात केली.

नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांसाठी जनतेच्या पैशांची नासा़डी करत असल्याचा आरोपही चंद्राबाबू नायडू यांनी केला होता.

‘आज आपण येथे सगळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी एकत्र आलो आहोत.

आपल्या आंदोलनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे गेले होते. याची गरजच काय असे मला विचारायचे आहे’, असा प्रश्च चंद्राबाबू नायडू यांनी विचारला आहे.

‘जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलेच माहित आहे.

हा आंध्रप्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल तेव्हा आम्ही सहन करणार नाही.

मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधान मोदींना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणे थांबवा’, असा इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *