Fri. Dec 3rd, 2021

PMC बँकेच्या शाखेबाहेर काँग्रेसचं ‘भीक मांगो’ आंदोलन!

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (PMC Bank) रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात असं घडल्यामुळे खातेदारांची चांगलीच गैरसोय झाली आहे.

अशा परिस्थितीत सरकार खातेदारांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन का देत नाही,  असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते चरण सिंह सापरा यांनी केला आहे. जर या खातेदारांचा प्रश्न लवकरात लवकर सुटला नाही तर त्यांच्यावर भीक मागायची वेळ येईल, म्हणूनच मुंबई काँग्रेसतर्फे (Congress, Mumbai) आज पीएमसी बँकेच्या सायन-कोळीवाडा शाखेबाहेर ‘भीक मांगो आंदोलन’ करण्यात आलं.

काय म्हणणं आहे काँग्रेसचं?

Reserve Bank of India ने काढला तुघलकी फतवा काढला आहे.

असा परिस्थितीत सत्ताधारी पीडितांना कोणतंही आश्वासन की देत नाही?

सणासुदीचे दिवस असताना बँकेच्या निर्बंधांचा प्रश्न सुटला नाही, तर खातेदारांना भिक मागायची पाळी येइल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘हावडी मोदी’ (Howdy Modi) प्रमाणे ‘हावडी पीएमसी’ का विचारत नाहीत?

हा 16 लाख लोकांचा प्रश्न आहे.

PMC बँकेला recapitalize करायला हवं.

या बँकेच्या बोर्डावर शिवसेना भाजपशी (Shivsena – BJP) शी संबंधित लोक आहेत. RBI चं पण या मध्ये संगनमत असेल, त्यामुळे याचीही चौकशी व्ह्याला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *