Sun. Sep 19th, 2021

‘अभिनंदन न्यूझीलंड’ पाकिस्तानी लष्कराचे भारताला डिवचणारे ट्विट

उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत प्रवेश करत केवळ 18 धावांनी पराभव झाल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र एकीकडे भारतीय चाहते निराश असून दुसरीकडे पाकिस्तानला आनंद झाला असल्याचे समजते आहे. पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आणि प्रवक्ते आसिफ गफूर यांनी सुद्धा ट्विट करत भारताला डिवचले आहे.

नेमकं ट्विटमध्ये आहे का ?

भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला.

यामध्ये न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल झाली आहे.

न्यूझीलंडने भारताला 240चे आव्हान दिले होते.

मात्र भारताने 221 धावा करत आपला खेळ आटोपला.

केवळ 18 धावांनी भारताचे WorldCup ड्रीम अधुरे राहिले.

यामुळे पाकिस्तानला प्रचंड आनंद झाला आहे.

पाकिस्तानचे लष्कर मेजर जनरल आणि प्रवक्ते आसिफ गफूर यांनी ट्विट करत न्यूझीलंडला शुभेच्छा दिल्या आहेत.

गफूर यांनी न्यूझीलंड टीमचे अभिनंदन केले असून एक महान देश नैतिक मुल्यांसह खेळला असल्याचे म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *