Sun. Jan 16th, 2022

काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळला आपल्याच पक्षाच्या नेत्याचा पुतळा

सोलापुरात आपल्याच पक्षाच्या ज्य़ेष्ठ नेत्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचं काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचा पुतळा त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी जाळला.

का जाळला खर्गेंचा पुतळा?

शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना मंत्रिपद देण्यास अडसर ठरल्याबद्दल महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यासमोरच्या परिसरात जाळण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातून एकमेव काँग्रेसच्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळालं नाही.

गेल्या तीन वेळा आमदार म्हणून काम करताना प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पार्टी वाढीबरोबर सोलापूरच्या विकासकामात मोलाची साथ दिली आहे.

अशा कर्तव्यदक्ष महिला आमदाराला डावलून जातीचं राजकारण करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी दुसऱ्या आमदारांना मंत्रिपद बहाल केल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.

‘मल्लिकार्जुन खर्गे यांना हटवा’ अशी मागणी देखील केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *