व्यापाऱ्यांचा मालमत्ता कर माफ करण्याची काँग्रेसची मागणी

कोरोना काळात सर्वत्र टाळेबंदी लागली असून अनेक व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले, शिवाय ठिकठिकाणातील लहान-मोठी दुकाने अनेक महिने पूर्णत: बंद होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे नवी मुंबईतील व्यापाऱ्यांचा मालमत्ता कर माफ करण्याची मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबईतील व्यापाऱ्यांचा मालमत्ता कर माफ करा तसेच खालच्या स्तरावर सुरू असलेला भ्रष्टाचार थांबवावा, निकृष्ट दर्जाची सुरू असलेली कामे थांबवावी आणि विनाकारण सुरू करण्यात आलेली कामे बंद करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे. काँग्रेस शिष्टमंडळाच्या या मागणीला मनपा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याप्रकरणी चौकशी करत योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.