नांदेड नगरपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

नांदेड जिल्ह्यातील नायगाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. नायगाव नगरपंचायतीमध्ये १७ जागांवर निवडणूकप्रक्रिया पार पडली असून १७ पैकी १७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, भाजपला एकही जागा मिळाली नाही.
नायगाव नगरपंचायतीवर सर्व १७ जागांवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजीसह मोटार-सायकल रॅली काढत विजयाच्या जोरदार घोषणा केल्या. तसेच माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. वसंतराव चव्हाण यांचा क्रेनच्या साहाय्याने विजयाचा हार घालून स्तकार करण्यात आला. काँग्रेसच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र, दरम्यान कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अर्धापूरमध्ये एमआयएमने या निवडणूकीत तीन जागांवर विजय मिळवत विरोधी पक्षाने विजय मिळवला आहे. तर माहूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. आणि अर्धापूरमध्ये काँग्रेसने सत्ता टिकवली आहे.
keep up the excellent work , I read few blog posts on this site and I believe that your weblog is real interesting and contains circles of great info .