Sun. Jun 20th, 2021

काँग्रेसला माझ्या हत्येचे स्वप्न पडत आहे – पंतप्रधान

काँग्रेसमधील लोकांमध्ये माझ्याबद्दल अत्यंत दोष आहे.यामुळे त्यांना माझ्या हत्येचे स्वप्न पडत आहे. पण देशातील जनता माझ्या पाठिशी आहे हे त्यांच्या लक्षात नाही. असे  वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभेत केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच काँग्रेसच्या काळात कुंभमेळ्यात अनेक लोक चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. पण यावर्षी मात्र हा उत्साहात पार पडला असे ते म्हणाले आहेत. एका कुटुंबाची ५५ वर्षांची सत्ता विरुद्ध चहावाल्याची ५५ महिन्यांची सत्ता यातील योग्य असणाऱ्याला निवडा असा सल्ला यावेळी त्यांनी लोकांना दिला आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

काँग्रेसमधील लोक माझ्या हत्येचे स्वप्न पाहत आहेत.

मात्र मध्य प्रदेशाबरोबरच देशातील जनता माझ्या पाठीशी आहेत. हे ते विसरले आहेत.

काँग्रेस पक्ष घराणेशाही रुजवण्याचे तसेच भ्रष्टाचाराचे काम प्रामाणिकपणे करतो आहे.

मी देशाच्या विकासासाठी काम करत आहे काँग्रेस मात्र घराणेशाहीतील नव्या पिढीसाठी काम करत आहे.

मात्र विकास आणि इतर बाबतीत हा पक्ष अप्रामाणिक आहे.

विरोधी पक्षांतील कित्येक लोक पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहू लागले आहेत.

एका कुटुंबाची ५५ वर्षांची सत्ता विरुद्ध चहावाल्याची ५५ महिन्यांची सत्ता यातील योग्य असणाऱ्याला निवडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *