Fri. Sep 20th, 2019

काँग्रेसला धक्का, हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

0Shares

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आपण हा प्रवेश बिनशर्त केला असून पक्ष देईल ती भूमिका पार पाडण्याची आपली तयारी असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?

5 वर्षं मुख्यमंत्र्यांनी कणखर कारभार केला.

आमच्यावर अन्याय झाला तेव्हा मुख्यमंत्री पाठीशी होते

कलम 370 हटवण्याची हिम्मत भाजपने दाखवली

निष्ठा, प्रामाणिकता जपायची असेल तर आताच्या काळात भाजपशिवाय पर्याय नाही

सकारात्मक भूमिका ठेवून राजकारण, समाजकारण केलं पाहिजे

अनेक संकटं आली, मात्र मुख्यमंत्र्यांचा चेहरा हसराच होता

आता तर हर्षवर्धन सोबत आलेत, त्यांना चिंता करण्याची गरज नाही

भाजपमध्ये विनाअट प्रवेश केलाय. पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडू

माझी कोणतीही वैयक्तिक मागणी नाही, मात्र इंदापूर तालुक्यावर झालेला अन्याय दूर करावा. तेथील पाणीप्रश्न सोडवावा अशा आपली मागणी आहे.

भाजप सर्वांना न्याय देईल, असा मला विश्वास आहे.

हर्षवर्धन पाटील यांचा योग्यवेळी पक्ष प्रवेश- मुख्यमंत्री

हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना आपण गेल्या 5 वर्षांपासून हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाची वाट पाहत होतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी अत्यंत योग्यवेळी पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्या आगमनामुळे भाजपाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *