Thu. Mar 4th, 2021

पुद्दुचेरीत काँग्रेस सरकार कोसळले; मुख्यमंत्री नारायणसामींचा राजीनामा

पुद्दुचेरीत काँग्रेस सरकार राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र अखेर बहुमत चाचणीत काँग्रेस सरकार अपयशी ठरले आहे. यानंतर नारायणसामी यांनी लेफ्टनंट गव्हर्नर तामिलीसाई सौंदराराजन यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला. काँग्रेस आमदारांच्या राजीनामा नाट्यानंतर पुद्दुचेरीत काँग्रेस सरकार राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीत काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. तर एक आमदार अयोग्य घोषित झाल्यानं विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावावं लागलं त्यामुळे होते. काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या डीएमके पक्षाच्या एका आमदाराने राजीनामा दिल्यानंतर 33 सदस्य असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत काँग्रेस सरकारकडे केवळ 12 आमदार राहिल्यानं पुद्दुचेरीत काँग्रेस सरकार कोसळले आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळविला होता. तर काँग्रेसचा सहकारी असलेल्या डीएमकेने 3 जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 16 आहे.

पक्षीय बलाबल

काँग्रेसकडे 12 आमदारांचे संख्याबळ ( विधानसभा सदस्य संख्या 33)

काँग्रेस – 9 ( काँग्रेसकडे 15 आमदार होते, पाच आमदारांनी राजीनामा दिलाय. तर एक आमदार आयोग्य घोषित)

डीमके – 2 (3 पैकी एकाचा राजीनामा)

अपक्ष आमदार – 1

एआयएनआर – 7

एआयएडीएमके – 4

भाजपा – 3

विरोधकांकडे – 14 संख्याबळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *