Thu. Aug 13th, 2020

गुजरातमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी निवडणूक; काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरातमधील राज्यसभेच्या 3 जागांसाठी निवडणूक पार पडली. काँग्रेस उमेदवार अहमद पटेल यांच्याविरोधात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती

इराणी आणि काँग्रेसमधून भाजपात आलेले बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार मैदानात उतरले आहेत.

 

शंकरसिंह वाघेला यांच्या बंडाळीचा फायदा घेत भाजपनं काँग्रेसचे आत्तापर्यंत सहा आमदार फोडले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या 57 वरुन 51 वर पोहचली

आहे.

 

अहमद पटेल यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 45 मतांची गरज आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा

धक्का आहे. गुजरातमध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *