Sun. Aug 25th, 2019

…म्हणून माझ्या आईबद्दल अपशब्द वापरत आहेत – नरेंद्र मोदी

0Shares

काँग्रेस माझा सामना करु शकत नाही म्हणून ते माझ्या आईबद्दल अपशब्द वापरत आहेत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशतील छतपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत मोदी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला.

काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनी पंतप्रधान मोदींच्या आईची तुलना डॉलरच्या तुलनेत रुपयाशी केली होती. ते म्हणाले होते की, “2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी मोदी म्हणायचे, डॉलर समोर रुपया इतका घसरत आहे की त्याचं मूल्य त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या वयाच्या जवळ पोहोचत आहे. आता आम्ही म्हणतो, आज रुपया इतका घसरत आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईच्या वया जवळ पोहोचला आहे.” त्यावर मोदींनी पलटवार केला आहे.

मोदी म्हणाले की, “ज्या आईला राजकारणाचा र माहित नाही, जी आई आपल्या पूजापाठमध्ये व्यस्त आहे, त्या आईला राजकारणात घेऊन आले. काँग्रेसच्या लोकांमध्ये मोदीचा सामना करण्याची ताकद नाही. ” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *