Wed. Oct 5th, 2022

काँग्रेसला राष्ट्रपती पदाची घाई

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपणार आहे. त्यामुळे पुढील राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तारीख जाहीर केली आहे. १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होईल. २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. २९ जूनपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येतील.

तर, काँग्रेसला राष्ट्रपती पदाची घाई असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत याप्रकरणी बैठक झाली. राष्ट्रपती पदाची निवडणूक घोषित झाली असताना ही बैठक झाली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुंबईत आलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पवारांच्या घरी धाडले. यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, सोनियांचा निरोप घेऊन गुरुवारी पवारांची भेट घेतली. समविचार पक्षांनी उमेदवार राष्ट्रपती निवडणुकीत उतरवायला हवा, असे त्यांनी पवारांना सांगितले.

दरम्यान, दिवस फार थोडे आहेत, जसे अर्जुनाचे लक्ष पोपटाच्या डोळ्यावर असते तसे आता आमचे लक्ष्य राज्यसभा निवडणूक आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवणे हे विजय निश्चित करत नाही. मतदारांच्या मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदार मतांचे वेटेज करणारा राष्ट्रपती होतो. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इलेक्टोलर कॉलेजच्या संदस्यांच्या मतांचे एकूण वेटेज १०९८८८२ आहे. उमेदवाराल विजयासाठी ५४९४४१ मते मिळवणे आवश्यक आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा

  • २९ जून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
  • १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक
  • २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.