Thu. Jan 27th, 2022

EVM ला विरोध करणं विरोधकांनी थांबवावं – नरेंद्र मोदी

दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आज राज्यसभेत मोदींचं पहिलं भाषण झालं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. EVM ला विरोध करणं विरोधकांनी थांबवावं अशा भाषेत त्यांनी काँग्रेसला सुनावले आहे.

दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आज राज्यसभेत मोदींचं पहिलं भाषण झालं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. EVM ला विरोध करणं विरोधकांनी थांबवावं अशा भाषेत त्यांनी काँग्रेसला सुनावले आहे. मॉब लिचिंगच्या घटनांमध्ये राजकारण करणं अयोग्यच आहे. हिंसेचं समर्थन कुणीही करु शकत नाही. असेही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले मोदी?

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषणात कित्येक दशकानंतर देशात एकहाती सत्ता आल्याचे म्हटलं आहे.

काँग्रेस हारली तर देश हारला का? जनतेने पुन्हा देशाची सेवा करण्याची संधी दिली.

2019 मध्ये देशाने भाजपाला बहुमत दिलं, काँग्रेसने देशाचा लोकांचा अपमान केला आहे.

जे लोक हारले त्यांनी जरी जनतेचा अपमान केला त्यांचे अभिनंदन केले नाही पण मी अभिनंदन करतो.

जे हारलेत ते देशाचा कौल मानावयास तयार नाहीत. अहंकाराला पण मर्यादा असते.

2000 रुपये दिले म्हणजे शेतकरी विकले का? आम्ही व्होटबँकेचे राजकारण करत नाही.

निवडणुकीत पहिल्यांदा महिलांनी पुरुषांएवढेच मतदान केलं. भाजपाचा विजय काँग्रेसला पाहावत नाही.

EVM बाबत सगळे नियम काँग्रेसनेचं केले आहेत. न्यायालयानेही EVM ला मान्यता दिली आहे.

एक देश एका निवडणुकीला विरोध का ? बॅलेटच्या वेळीही बूथ कॅप्चर झालं ना?

सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न केला. सरकारच्या योजनांची टिंगल करणं ही नकारात्मक बाब आहे.

मॉब लिचिंगच्या घटनांमध्ये राजकारण करणं अयोग्यच आहे. हिंसेचं समर्थन कुणीही करु शकत नाही.

पण संपुर्ण झारखंड राज्याला दोषी ठरवणं अयोग्य आहे. राजकीय चष्मे उतरवले तर सर्व दिसेल.

EVM वर खापर फोडणं विरोधकांनी थांबवावं. शीख दंगलीत सहभागी असणारे आजही काँग्रसमध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *