Tue. Oct 26th, 2021

“कॉंग्रेसला आघाडीसाठी आम्ही वारंवार विचारले” – केजरीवाल

आगामी लोकसभा निवडणुक काही महिन्यांवर असल्यामुळे राजकीय पक्ष प्रचार, दौरा करण्यासाठी सज्ज झाली आहेत. एकीकडे भाजप मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे इतर पक्ष महागठबंधन करताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा परभाव करण्यासाठी समविचारी पक्ष आघाडी करण्याच्या मार्गावर आहे. आघाडीसाठी आम्ही वारंवार विचारुनही कॉंग्रेस काही उत्तर देत नसल्याचे खंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील चांदणी चौक येथे बुधवारी झालेल्या एका सभेत त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले ?

कॉंग्रेसबरोबर जर आघाडी झाली तर भाजपाला दिल्लीत पराभव स्वीकारावा लागेल.

त्यामुळे अरविंद केजरीवाल कॉंग्रेसला आघाडीसाठी तयार करत आहेत.

आघाडीसाठी कॉंग्रेस नकार देत असून त्यांना मी सारखं- सारखं विचारुन थकलो आहे.

कॉंग्रेसच्या मनात काय आहे ते मला ठाऊक नाही असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस दुसऱ्या पक्षांना कमजोर करीत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलं आहे.

त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा पक्ष ‘आप’ लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढणार असल्याचेही त्यांनी म्हटलं.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *