Jaimaharashtra news

काँग्रेस आणि सनातनवाद्यांचं साटंलोटं – प्रकाश आंबेडकर

देशात आणि राज्यात RSS आणि भाजप विचारांचं सरकार यावं, अशी काँग्रेस नेत्यांची धारणा आहे. त्यामुळेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासहित राज्यातील 30 टक्के उमेदवार हे सनातनवाद्यांशी संबंधित आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. पंढरपूर येथे संत तनपुरे महाराज मठात आज दुपारी प्रकाश आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असताना त्यांनी काँग्रेस आणि सनातनवाद्यांवर टीका केली.

BJP चं सरकार यावं ही काँग्रेसचीच इच्छा!- आंबेडकर

काँग्रेस आणि सनातनवाद्यांचं साटंलोटं असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

काँग्रेसने RSSला कायद्याच्या चौकटीत आणावं, अशी मागणी करत आपण करत होतो याची आठवण आंबेडकरांनी करून दिली.

तर वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना काँग्रेस मात्र त्यांना BJP ची टीम B ठरवण्याचा प्रयत्न करत आहे.

यावर आंबेडकर यांनी एक प्रकारे सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आणि त्यांच्याबरोबर काँग्रेसचे राज्यातील 30% उमेदवार सनातनवाद्यांशी संबंधित आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी केलाय.

आता या आरोपांवर काँग्रेस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Exit mobile version