Sat. Jun 6th, 2020

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांच वयाच्या 77 व्या वर्षी निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. जयपाल रेड्डी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. जयपाल रेड्डी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यूपीए सरकारच्या काळात जयपाल रेड्डी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार सांभाळला होता. आंध्रप्रदेशात जयपाल रेड्डी चारवेळा आमदार आणि 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

जयपाल रेड्डींचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांना न्युमोनियाचा त्रास होता. त्यांच्यावर हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

यूपीए सरकारच्या काळात जयपाल रेड्डी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार सांभाळला होता. आंध्रप्रदेशात जयपाल रेड्डी चारवेळा आमदार आणि 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

काँग्रेस पक्षातून त्यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीस सुरुवात केली होती. 1969 ते 1984 दरम्यान ते आंध्रप्रदेश मध्ये आमदार होते.

आणीबाणीच्या काळात त्यांनी कॉग्रेसचा विरोध केला आणि जनता दलामध्ये प्रवेश केला आहे. 1999 मध्ये त्यांनी पुन्हा कॉग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे.

ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. तर मनमोहन सिंग सरकारच्या काळात पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *