Sun. Jun 20th, 2021

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘या’ महत्वाच्या घोषणा

 

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा रोजगार, शेतकरी, नोकरदार आणि महिला या सर्व गोष्टींचा विचार करत प्रसिद्ध करण्यात आला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी देशात खोटी आश्वासने दिली जात आहे. मात्र कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात कोणतीही खोटी घोषणा करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.  कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात काय आहे महत्वाच्या घोषणा याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

काय आहे कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्वाच्या घोषणा ?

गरिबांना दर वर्षी 72 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.

तसेच प्रति महिना थेट गरिबांच्या खात्यात पैसे जमा होणार.

देशातील २२ लाख तरूणांना सरकारी नोकरी मिळणार आहे.

दहा लाख तरूणांना ग्रामपंचायतीत रोजगार देणार आहे.

मनरेगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगारांची संख्या 150 करणार.

मनरेगाच्या माध्यमातून 150 दिवसांचा खात्रीलायक रोजगार उपलबध करुन देणार

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज लागणार नाही.

तीन वर्षांपर्यंत विना परवानगी व्यवसाय सुरू करण्यात येऊ शकतो.

शेतकऱ्यांसाठी वेगळं बजेट सादर करणार आहे.

कर्ज फेडू न शकणाऱ्या शेतकऱ्यांवर फौजदारी एवजी दिवानी स्वरुपाचे गुन्हे दाखल करणार.

जीडीपीच्या 6 टक्के बजेट शिक्षणासाठी देणार आहे.

देशामध्ये गरीब जनतेला चांगल्या रुग्णालयामध्ये उपचार उपलब्ध होणार.

देशातील मोठ्या शैक्षणिक संस्था सर्वांसाठी उपलब्ध होणार.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *