Jaimaharashtra news

कॉंग्रेसचा जाहीरनामा देशाला तोडणारा – अरुण जेटली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाने कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली.  अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेऊ शकत नाही असे म्हटले आहे. तसेच कॉंग्रेसच्या आश्वासनामुळे देशाच्या एकतेला धोका असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेसच्या आश्वासनामुळे देशाच्या एकतेला धोका –

कॉंग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

या जाहीरनाम्यात गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे.

भाजपाने पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली.

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवू शकत नाही असे अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेसचा जाहीरनामा देशाला तोडणारा आहे.

दहशतवाद, नक्षलवादाला खतपाणी देणारे आश्वासन कॉंग्रेसने दिले असल्याचे जेटलींनी म्हटलं आहे.

देशद्रोहाचा आरोप करणाऱ्याला मतदान करू नका असे आवाहन अरूण जेटली यांनी दिले आहे.

 

 

 

 

Exit mobile version