Fri. Oct 7th, 2022

सलमान खान इंदूरमधून लोकसभा निवडणूक लढणार ?

करीना कपूर काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची अफवा काही दिवसांपूर्वी पसरवली होती. त्यापाठोपाठ आता सलमान खानसुद्धा काँग्रेसकडून निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. सलमानला काँग्रेसकडून मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.

सलमान खानला तिकिट का?

काँग्रेस नेते सचिन राकेश यादव यांच्या वक्तव्यानुसार, ‘लोकसभा निवडणुकीत इंदूरच्या जागेवर सलमान खानच्या नावाची चर्चा आहे. सलमान खान यांनी जर निवडणूक लढवली तर त्यामुळे इंदूरमधील तरूण-तरूणींना सिनेसृष्टीचा जवळून अनुभव घेता येईल.’

सलमानचं ‘इंदूर’ कनेक्शन-

सलमान खानचा जन्म इंदूरचा आहे.

सलमानचा बालपणातील बराचसा काळ इंदूरमध्येच व्यथित झाला.

व्यस्त शेड्युलमधून जमेल तसा वेळ काढून सलमान इंदूरला जात असतो.

अनेकदा इंदूर शहराविषयीचं आपलं प्रेम सलमानने जाहीरपणे व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा –  काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार का? करिना कपूर म्हणाली…

 

उपलब्ध माहितीनुसार

मध्य प्रदेशमधून करिना कपूर आणि सलमान खान यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा एमपी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे बोलून दाखवली आहे. मध्यप्रदेशमधील भोपाळची सीट करिना कपूरला तर इंदौरची सीट सलमानला द्यावी. लोकसभा निवडणुकांसाठी मध्यप्रदेशच्या सीट्सवर भाजपाने आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केले. तर काँग्रेसकडून हे दोन लोकप्रिय चेहरे त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करु शकतील, असे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.