Fri. Sep 24th, 2021

लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीसाठी काँग्रेसची बैठक

लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काल आणि आज मुंबईत बैठक घेण्यात येत आहेत.

या बैठकीत जिल्हानिहाय लोकसभा मतदारसंघातील जागांचा आढावा घेण्यात येणार आहे.

आज होणाऱ्या बैठकीत कल्याण, ठाणे, यवतमाळ,अहमदनगर, उस्मानाबाद, माढा, सातारा, ईशान्य मुंबई या लोकसभा जागांवर विचार मंथन केले जाणार आहे.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्याविषयी काय निर्णय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या बैठकीत शरद पवार, अजित पवार, प्रफुल पटेल जयंत पाटील सुनील तटकरे सोबत सर्व नेते मंडळी हजर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *