Mon. Jan 17th, 2022

काँग्रेसच्या जयकुमार गोरे यांनी घेतली गिरीश महाजन यांची भेट

लोकसभा निवडणुकांतर राजकिय वातावरणांत बदल होत असताना दिसत आहे. राजकिय नेत्यांच्या भेटीगाठी, चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. राज-पवार यांची भेट असो किंवी मग शरद पवार यांनी घेतलेली राहुल गांधीची भेट असो याच्या चर्चा राजकारणात रंगत आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादीचे नाराज नेतेहूी इतर पक्षांसोबत भेटीगाठी घेताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षाचे माण-खटाव तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन महाजन यांची भेट घेतली. यामुळे ते भाजपाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

माण-खटाव तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज गिरीश महाजन यांनी भेट घेतली.

माढा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन महाजन यांची भेट घेतली.

काँग्रेस पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी  राधाकृष्ण विखे पाटील यांची ही भेट घेतल्याचं दिसून आलं आहे.

विखे पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट झाले आहे.

जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उघड पाठिंबा दिला होता.

त्यामुळे गोरे हे विखे पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *