Jaimaharashtra news

महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार – बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्याने आता माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे आणि या जबाबदारीतून आम्ही यशस्वी होणार असल्याचा विश्वास थोरात यांनी निवडी नंतर प्रतिक्रिया देतांना व्यक्त केला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात ?

सर्वांमध्ये नवीन विश्वास निर्माण करणार असून सगळ्या समविचारी लोकांनी बरोबर रहावे ही माझी भूमिका आहे.

त्यासाठी मी प्रयत्न करनार असल्याचं त्यांना म्हटल आहे. अंतर्गत कलह दूर करून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करनार आहे.

अशोक चव्हाण यांनी चांगलं काम केलय आता पक्षातून काही लोक सोडून जातायत मात्र त्यामुळे नव्या लोकांना संधी मिळणार आहे.

कॉग्रेसने आजवर अनेक चढउतार बघीतलेत जेव्हा पक्षातून कोणी बाहेर जातं तेव्हा नव्या नेतृत्वाला संधी मिळते असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे आहेत तर आता कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी मामा बाळासाहेब थोरात यांना कॉग्रेसने जबाबदारी दिली आहे.

एकाच घरातील असलेली ही दोघे आता कॉग्रेसला महाराष्ट्रात किती संजीवनी देतात हे पहाणे महत्वाचं असणार आहे.

Exit mobile version