Sat. Jul 2nd, 2022

कॉंग्रेस- राष्ट्रवादी नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश

सध्या काही दिवसांपासून भाजपामध्ये ईनकमिंग सुरू असून आज कॉंग्रेस- राष्ट्रवादी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आज मुंबईतील गरवारे क्लब हाऊसमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, संदीप नाईक, सागर नाईक, कालिदास कोळंबकर, शिवेंद्रराजे, चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांनीही भाजपात प्रवेश केल्याचे समजते आहे. विरोधी पक्षातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

काय म्हणाले मधुकर पिचड ?

महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपामध्ये केला आहे.

आम्हाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाट दाखवली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतील असे मधुकर पितड यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुढील वाटचाल करणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मधुकर पिचडांचा पक्षप्रवेश हा महत्त्वापूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शिवेंद्रराजे भाजपात प्रवेश करणे आनंदाची गोष्ट.

सर्व निर्णय माझ्या मागे लागून कोळंबकरांनी पूर्ण करून घेतले.

कोळंबकर हा जनेतेचा माणूस.

आम्ही आधी मुलांना घेतलं मग पिता आपोआप वळले.

चित्रा वाघ यांच्या प्रवेशावर शरद पवारांना बोलावं लागलं.

योग्यवेळी चित्रा वाघ शरद पवारांना उत्तर देतील.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.