Thu. Sep 29th, 2022

काँग्रेसकडून भाजपाच्या ‘या’ दोन मतांवर आक्षेप

विधान परिषदेसाठी सोमवारी मतदान पार पडले. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसेच भाई जगताप यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.

विधान परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अशातच, काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. भाजपच्या दोन आमदारांवर काँग्रेसकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. या दोन्ही आमदारांऐवजी त्यांच्या समवेत सहकाऱ्यांनी मतपत्रिका बॉक्समध्ये टाकल्या, असा आक्षेप काँग्रेसकडून नोंदवण्यात आला आहे.

पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिकळ या कर्करोगाने त्रस्त आहेत. सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत मुक्ता टिळक यांनी मतदान केले. मुक्ता टिळक यांना व्हिलचेअरवरून विधानभवनात नेण्यात आलं. आजारी असतानाही त्या मतदानासाठी हजर राहिल्या.

तर, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. मात्र, तरीही त्यांनीसुद्धा मुंबईत येऊन विधानपरिषदेसाठी मतदान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.