Tue. Aug 9th, 2022

संभाजीनगर नामकरणाला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले होते. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पाहता उद्धव ठाकरे सरकारची ही कदाचित शेवटची बैठक होती. ठाकरे सरकारने मोठा निर्णय जाहीर केला. ठाकरे सरकारकडून नामांतराचे दोन प्रस्ताव मंजूर झाले असून यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी मंजूर झाली आहे. तसेच उस्मानाबादचे धाराशिव नामकरण होणार असल्याचे स्पष्ट झाले. बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ठाकरे सरकारने शेवटच्या दिवशी घेतलेल्या या निर्णयाचे महाविकास आघाडी सरकारमध्ये पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.

काँग्रेसपक्षातून या निर्णयाला तीव्र विरोध होताना दिसल्याचे चित्र समोर आले आहे. औरंगाबादच्या ३०० काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झाल्यामुळे हे राजीनामे देण्यात आले आहेत असे समोर आले आहे. शहराध्यक्ष,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष, माजी शहराध्यक्ष यांच्यासह ३०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शहराच्या नामांतराचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. या निर्णयाचा विरोध करत औरंगाबाद जिल्ह्यातील ३०० पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.