Mon. Aug 15th, 2022

काँग्रेसची 8 वी यादी जाहीर; अशोक चव्हाण नांदेड मधून लढणार

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्ष आपली  उमेदवार यादी जाहीर करत आहेत. नकतीच भाजपाना तिसरी तर काँग्रेसने सातवी यादी जाहीर केली होती यामध्ये भाजपाने महाराष्ट्रातील सहा तर काँग्रेसने पाच उमेदवारांची नावे जाहीरल केली आहे. तर शनिवारी रात्री उशिरा ३८ उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं नाव या यादीत असून ते पुन्हा नांदेड मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. या जागेवर पवार यांची पत्नी  निवडणूक लढणार अशी चर्चा होती मात्र काँग्रेसच्या या यादीने या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.या लिस्ट मध्ये कर्नाटक -18, मध्य प्रदेश  9, महाराष्ट्र  1, मणिपुर   2, उत्तराखंड 5,  उत्तर प्रदेश  3 अशा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.काँग्रेसने 8 यादयांमध्ये 218  उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

काँग्रेसच्या 8 व्या यादीत हे उमेदवार

काँग्रेसनं शनिवारी रात्री उशिरा ३८ उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली.

ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना भोपाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश येथील उमेदवारांचा समावेश आहे.

काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांना कर्नाटकातील गुलबर्गातून उमेदवारी देण्यात आली आहे.

अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

या यादीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं एकमेव नाव आहे.

ॉकाँग्रेसनं कोणताही धोका न पत्करता खुद्द चव्हाण यांनाच पुन्हा येथून उतरवलं असल्याचं बोललं जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.