वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांचा अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरमळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.राहुल गांधी पहिल्यांदाच दोन मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.वायनाडमध्ये राहुल गांधींची लढत एलडीएफचे पी.पी.सुनीर यांच्याबरोबर होणार आहे तर अमेठीत राहुल गांधीं विरुद्ध भाजपाच्या स्मृती इराणी अशी लढत होणार आहे.आज अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.यावेळी प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या.2014 च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी स्मृती इराणी यांना पराभव स्विकारावा लागला होता.
उमेदवारीसाठी वायनाडच का?
केरळ काँग्रेस समितीच्या म्हणण्यानुसार केरळमधील वायनाड हा मतदारसंघ उमेदवारीसाठी योग्य आहे.
वायनाड हा मतदारसंघ उत्तर केरळमध्ये असून कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या सीमेवर हा आहे.
2014 च्या निवडणुकीत काँग्रेसनेते एम.आय.शानावास हे विजयी झाली होती.
2009च्या मतदारसंघ पूनर्रचमध्ये हा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे.
या मतदारसंघात एकूण 13 लाख मतदारांपैकी 56 टक्के मतदार मुस्लिम आहेत.
राहुल गांधींच्या नावाच्या घोषणेनंतर भाजपाकडून कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरू आहे.