काँग्रेस राष्ट्राध्यक्षपदी राहुल गांधी होणार विराजमान?
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाकडून सोमवारी पक्षातंर्गत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. येत्या 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळात या निवडणुका होणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाच्या नवा अध्यक्षही निवडला जाईल. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असतील. सध्या सोनिया गांधी गेल्या 19 वर्षांपासून काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. काँग्रेस अध्यक्षाची निवड 2015 पर्यंत होणे अपेक्षित होते. पण आतापर्यंत यासाठी तीनवेळा मुदतवाढ मागत काँग्रेसनं चालढकल केली.