Wed. Aug 10th, 2022

संसदेत राहुल गांधीचा मोदी सरकारवर हल्ला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत भाषण केल्यानंतर आज राहुल गांधी लोकसभेत आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. राहुल गांधीनी मोदी सरकारवर अनेक आरोप केले या आरोपात बाजार समित्या बंद करण्याचा डाव हे मोदी सरकार करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशाचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ते आज म्हणाले. यावेळी भाजपच्या खासदारांनी संसदेत गोंधळ करुन
मोठ्या प्रमाणात सभागृहात गदारोळ घातला.

“काही वर्षांपूर्वी ‘हम दो हमारे दो’ घोषणा देण्यात आला होती. कोरोना ज्याप्रमाणे दुसऱ्या रुपात आला आहे तसेच ही घोषणा आली आहे. हा देश चार लोक चालवतात ‘हम दो और हमारे दो’,” असा टोला देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकार लगावला. नरेंद्र मोदी हेतूबद्दल बोलले होते, मात्र त्यांचा हेतू फक्त आपल्या मित्रांची मदत करणं आहे असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. भूक, बेरोजगारी हे पर्याय आपण दिले आहेत असं उत्तरही त्यांनी नरेंद्र मोदींना दिलं.

“कायदे लागू झाल्यानंतर देशातील शेतकरी, दुकानदार, छोटे व्यापारी यांचे व्यवसाय बंद होतील. फक्त दोन लोक देश चालवणार. अनेक वर्षांनी भारतातील लोक भूकबळीचे शिकार ठरतील. रोजगार मिळणार नाहीत. नोटबंदीपासून मोदींनी याची सुरुवात केली. गरीब, शेतकरी, मजुरांकडून पैसे घेऊन खिशात टाकण्याची योजना होती. नंतर जीएसटी… गब्बर सिंग टॅक्स आणला. नंतर पुन्हा तेच शेतकरी, व्यापारी, दुकानदारांवर आक्रमण केलं. कोरोना संकटात मजूर बसचं तिकीट मागत होते पण देण्यात आलं नाही” असं राहुल गांधी म्हणाले.

“आज आपला देश रोजगार निर्मिती करु शकत नाही. उद्याही रोजगार येणार नाहीत कारण सरकारने छोटे उद्योग, व्यापारी, मजूर, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. हे शेतकऱ्यांचं नाही तर देशाचं आंदोलन आहे. शेतकरी अंधारात बॅटरी दाखवत आहेत. देश हम दो हमारे दो विरोधात उठणार आहे. शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही. शेतकरी, छोटे दुकानदार तुम्हाला हटवणार आहेत. तुम्हाला कायदे मागे घ्यावेच लागतील,” असं राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत

7 thoughts on “संसदेत राहुल गांधीचा मोदी सरकारवर हल्ला…

  1. Ahaa, its nice dialogue on the topic of this piece of writing at this place at this webpage, I have read all that, so now me also commenting here. Deangelo Ciminera

  2. You made some good points there. I searched the net for the issue and also discovered most individuals will certainly accompany with your website. Ellsworth Mccort

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.