काँग्रेसने मतदानाचा कोटा वाढवला

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. पक्षाच्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र, अशातच राजकारणात घडामोड घडली असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसनेही मतदानाचा कोटा वाढवला आहे. काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांच्यासाठी काँग्रेसने मतांचा कोटा ४४ केला आहे. त्यामुळे आता शिसवेनेची गोची होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांची मतं धोक्यात येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीनेही मतदानाचा कोटा वाढवला
राज्यसभेची निवडणूक विजयी होण्यासाठी उमेदवाराला ४२ मतं लागणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दोन नेते अटकेत असल्यामुळे राष्ट्रवादीची दोन मतं कमी झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने ४२ मतांचा असलेला कोटा ४४ केला आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठीचा उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी पवारांनी मतांचा कोटा वाढवला आहे.
एमआयएमचा मविआला पाठिंबा
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएमचे आमदार मविआला पाठिंबा करणार असल्याचे सांगितले आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी एमआयएमने मविआला मतदान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले. तसेच एमआयएमचे दोन्ही आमदार काँग्रसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र काँग्रेस समोर आव्हान काय आहे?
- राज्यसभा निवडणुकीसाठी उपरा चेहरा.
- उत्तर प्रदेशाच्या उमेदवाराला उतरवल्याने मराठी काँग्रेसजन हिरमुसले.
- महाराष्ट्र काँग्रेसकडे राज्यसभेसाठी मत कोटा तुटपुंजा.
- काँग्रेसचा महाराष्ट्रात विजयासाठी राष्ट्रवादीवर भार.
- राष्ट्रवादीला मात्र शिवसेनेची जास्त चिंता.