Sat. Sep 18th, 2021

‘हम निभाएंगे’ कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा जाहीरनामा  प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनाम्यासाठी  वेगवेगळ्या समित्या बनवण्यात आल्या होत्या.समाजातील सर्व घटकांचा अभ्यास करुन हा जाहिरनामा तयार करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. मोदी सरकारविरूद्ध विरोधकाची भुमिका घेतलेल्या कॉंग्रेसने या जाहीरनाम्यामध्ये  कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला असेल, याची उत्सुकता लागलेली होती. काँग्रेसने आपल्या जाहीरनामा 5 संकल्पनांवर आधारित आहे असं सांगत ‘ हम निभाएंगे’ या नावाखाली प्रसिद्ध केला आहे.

कॉंग्रेसच्या  जाहीरनाम्यात या मु्द्यांचा समावेश

‘ हम निभाएंगे’ नावाखाली  कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  यांनी जाहीरनामा  प्रसिद्ध केला.

काँग्रेसने जाहीरनामा 5 संकल्पनांवर आधारित असल्याचं सांगण्यात आलं

जाहीरनाम्याची पहिली संकल्पना म्हणजे ‘न्याय’ असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं.

जनतेला वार्षिक ७२ हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे.

दलित, तरूण, महिला, शेतकरी यांना  या जाहीरनाम्यात  प्राधान्य देण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज बुडवलं तर फौजदारी कायद्याऐवजी दिवाणी कायदा लागू केला जाईल.

ग्रामीण भागातील १० लाख तरूणांना ग्राम पंचायतीमध्ये रोजगाराची हमी देण्यात आली आहे.

देशातील २२ लाख तरुणांना सरकारी नोकरी देण्यात येणार आहे.

किमान आर्थिक मदत योजना या योजनेअंतर्गत देशाच्या गरीबी रेषेखाली राहणाऱ्यांना  २५ कोटींची तरतूद करण्यात येईल.

शेतकरी गटासाठी त्यांच्या कर्जप्रणालीवर काम करण्यासाठी वेगळं बजेट तयार करण्यात येईल.

तरुण  उद्योजकांसाठी नवे उद्योगांसाठी 3  वर्ष  परवानगीची गरज लागणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *