Sun. Oct 17th, 2021

पंतप्रधान मोदींच्या बायोपिकवर बंदी घाला, निवडणूक आयोगाकडे ‘काँग्रेस’ची मागणी     

लोकसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर आठवडाभराच्या आतच पंतप्रधान मोदींच्या बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली.

मात्र आता प्रदर्शनाच्या तारखेवरून वाद सुरू झाला असून या सिनेमावर निवडणुकांच्या काळात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

गोव्यातील काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकवर बंदी घालण्याची मागणी निवडणूक आगोयाकडे केली असल्याची माहिती ‘द रिपब्लिक’ वृत्तवाहिनीने दिली आहे.

या सिनेमात भाजपाचा छुपा अजेंडा लपला असून मतं मिळवण्यासाठी या सिनेमाचा वापर केला जात असल्याचा आरोप ‘द नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया’ (NSUI) ने केला आहे.

गेल्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या.

सात टप्प्यात 11 एप्रिल ते 19 मे या दरम्यान मतदान होणार आहे.

या तारखा जाहीर झाल्यानंतर आठवडाभराच्या आत मोदींचा बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

हा सिनेमा 12 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

मोदींना अपयश आले आहे आता अपयश लपवण्यासाठी अधिकाधिक मतदारांना प्रभावित करून जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी या सिनेमाचा वापर केला जात आहे असा आरोप NSUI ने केला आहे.

ज्या मतदार संघातून मोदी निवडणूक लढवतील त्या राज्यात या सिनेमावर पूर्णपणे बंदी घालवी अशी मागणी NSUI केली आहे.

या स्वरूपाचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवून त्यांनी बंदीची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *