Sun. Jun 7th, 2020

अभिनेत्री केतकी चितळेनंतर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची तक्रार!

‘सत्ताधारी भाजपचे समर्थक सरकारवर टीका करणाऱ्यांना social media वर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत आहेत. सोशल मिडीयावरील या विकृतांविरोधात कडक कारवाई करावी’ अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

काय आहे सचिन सावंत यांची तक्रार?

अभिनेत्री केतकी चितळे यांना समाजमाध्यमांवर त्यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल अत्यंत हीन पातळीची भाषा वापरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

राज्यभरात अशा तऱ्हेच्या अनेक घटना रोज घडत आहेत.

मला स्वतःला 2015 साली चिक्की घोटाळा उघडकीस आणला असताना धमक्या आणि शिवीगाळीचा अनुभव आला होता.

त्यावेळी याची रीतसर तक्रार समतानगर पोलीस ठाणे कांदिवली, मुंबई येथे केली होती.

मे महिन्यामध्ये देखील असाच वाईट अनुभव आला.

त्याचीही तक्रार सदर पोलीस स्थानकात मी 7 मे रोजी केली.

गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर केलेल्या टीकेवरील Tweet संदर्भात Social Media वर अत्यंत हीन पातळीवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जात आहे.

फोनवरून आणि Social Media वरून जाहीर धमक्या दिल्या जात आहेत.

यामध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचा दंभ या धमक्या देणाऱ्यांकडून दाखवला जात आहे.

प्रश्न हा आहे की विरोधकांनी केलेली टीका सरकारला आवडत नाही का?

लोकशाहीमध्ये विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे.

लोकशाहीची उदात्त परंपरा आणि पुरोगामी विचारधारा असणाऱ्या महाराष्ट्रात यापूर्वी असं कधी घडलं नाही.

लोकशाहीच्या या प्रथांचे आणि परंपरांचे पालन करण्याची जबाबदारी सरकारचे प्रमुख आणि राज्याच्या गृहविभागाचे मंत्री म्हणून आपली आहे. त्यामुळे उन्मत आणि सत्तेच्या धुंदीने बेभान झालेल्या या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी असं सावंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *