Mon. May 27th, 2019

प्रियंका चतुर्वेदींची काँग्रेसला सोडचिठ्ठी शिवसेनेत प्रवेश

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाकडून होत असलेल्या वाईट वागणुकीला कंटाळून  हा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. चतुर्वेदी यांनी राहुल गांधी यांच्याकडे  हा राजीनामा सुपुर्द केल्यामुळे त्यांच्या या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. तसेच काँग्रेसला रामराम करत प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशा चर्चेवर आज प्रियंका यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन पक्ष प्रवेश केला आहे.शिवसेनेच्या प्रसारासाठी काम करणार आहे असं मत प्रियांका यांनी व्यक्त केलं आहे.काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती असं ही त्या म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी ? 

या वागणुकीला कंटाळून त्यांनी पक्षाला रामराम करत आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

त्यासाठी शिवसेनेने आज पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती.

काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती असं मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

यापुढे शिवसेनेच्या प्रसारासाठी काम करणार आहे असं ही त्या म्हणाल्या.

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या गैरवर्तनाला  कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रियंका चतुर्वेदी निराश का 

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडून मिळत असलेल्या वाईट वर्तवणुकीमुळे नाराज होत्या.

ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा हा राजीनामा काँग्रेस पक्षाला झटका देणारा आहे.

गेल्या वर्षी मथुरामध्ये झालेल्या प्रेस काँन्फरन्स दरम्यान त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक मिळाली होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *