Tue. Feb 25th, 2020

राहुल गांधी योगासनं करत नसल्यामुळेच काँग्रेसचा पराभव- बाबा रामदेव

योगदिनाच्या पार्श्वभूमीवर योगगुरू बाबा रामदेव यांनी काँग्रेसच्या पराभवाचं कारण योग न करणं हे असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी योग करत नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय.

योगासनं न केल्याने पराभव!

पंतप्रधान नरेंद्र मोदी योगासनं करतात, त्यामुळेच ते जिंकले, असं रामदेव बाबांनी म्हटलं.

दिवंगत माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी हे देखील योगासनं करत होते, असं बाबा रामदेव यांचं म्हणणं आहे.

नेहरू आणि इंदिरा गांधी सर्वांच्या नकळत योगासनं करत होते. मात्र काँग्रेसच्या नंतरच्या पिढीने योगासनं कमी केल्यामुळे त्यांना राजकारणात आता अपयश येतंय, असं विधान बाबा रामदेव यांनी केलंय.

योगासनं केल्यामुळेच ‘अच्छे दिन’ येतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *