Sat. May 25th, 2019

लोकसभेच्या निकालानंतर राज ठाकरेंसाठी काँग्रेसची बैठक

0Shares

नुकत्याच लोकसभा निवडणुकांसाठीच मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीचा निकाल 23 मे जाहीर होईल. तसेच विधासभा निवडणुकाही जवळ आल्या आहेत. राजकिय पक्ष आत्तापासूनच विधानसभेची तयारी करण्यास सुरूवात केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील हायकमांडसोबत बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभेला राज यांच्या मनसेसोबत आघाडी करावी का? यावर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये राज ठाकरे विधासभेसाठी किती जागांची मागणी करणार याबद्दल काँग्रेस नेत्यांमध्ये धाकधुक आहे. असं ही म्हटलं जात आहे.

राज ठाकरेंसाठी काँग्रेसची बैठक

लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेचा एकही उमेदवार नसला तरी त्यांनी सभा घेतल्या.

महाराष्ट्रात 10-12 तुफान गर्दीच्या सभा घेऊन नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडीवर टीका केली.

राज यांच्या सभेनंतर मतदारसंघात वातावरण बदलले असल्याचे अनेकांनी सांगीतले आहे.

राज यांच्या सभेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार हे नक्की असल्याचही काँग्रेस नेत्याने म्हटलं आहे.

त्यामुळेचं लोकसभेचा निकालाच विश्लेषण आणि मनसेसोबत आघाडी या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक होईलं.

तर राज ठाकरेंमुळे उत्तरेकडील मत जाण्याची शक्यता आहे. असं ही काँग्रेसमधील एका गटाचं मत आहे.

केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करण्यात येणार असून मग निर्णय घेण्यात येईल असं ही सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *