Wed. Dec 8th, 2021

कॉंग्रेस गरीबीवर सर्जिकल स्ट्राईक करणार – राहुल गांधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कॉंग्रेसने नागपूर येथे फोडला. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपूर येथे आयोजीत केलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती टीका केली. कॉंग्रेस फक्त आश्वासन देत नाही ते पूर्ण ही करतं असे म्हणत राहुल गांधींनी भाषणाला सुरुवात केली. या सभेत राहुल गांधी यांनी मोदींनी ५ वर्षात गरीब केले असल्याचेही म्हटलं आहे.

कॉंग्रेस गरीबीवर सर्जिकल स्ट्राईक करणार – राहुल गांधी

राहुल गांधी यांची नागपूरमध्ये जाहीर सभा झाली.

कॉंग्रेस फक्त आश्वासन देत नाही, पूर्णही करतं असं म्हणत मोदींवर टोला लगावला.

मोदींनी ५ वर्षात गरीब केले आहे.

आम्ही कोट्यावधी लोकांना गरिबी रेषेवरून बाहेर काढलं असल्याचा दावा राहुल गांधी केला.

नरेंद्र मोदींनी १५ लाखांचं आश्वासन दिलं, त्याचं काय झाला ? असा सवाल मोदींना केला आहे.

मोदींनी श्रीमंतांचे लाखो कोटी रुपये माफ केले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही? असाही प्रश्न उपस्थित केला.

कॉंग्रेसने आश्वासन दिल्याप्रमाणे तीन राज्यात कर्जमाफी केली

राजस्थान, छत्तीसगढ, राजस्थानमध्ये कर्जमाफी केली

अनिल अंबानीच्या खिशातून पैसा काढणार, गरिबांच्या खिशात टाकणार

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *